आपला भारतदेश आणि जर्मनी यांच्यामध्ये झालेला हॉकीचा सामना हे संघशक्तीचे एक उत्तम उदाहरण आहे.
सामन्याबद्दल सगळी माहिती दूरदर्शन आणि वर्तमानपत्रातून आपण घेतलीच आहे. मला मात्र हा सामना एका वेगळ्याच कारणासाठी उंची गाठणारा वाटतो,ती म्हणजे संघशक्ती आणि दुर्दम्य इच्छाशक्ती .भारतीय संघाला तब्बल 41 वर्षानंतर मिळालेल्या संधीचे आपल्या हॉकी वीरांनी कास्यपदक घेऊन सोन तर केलंच पण भारतीयांना फार मोठा धडाही दिला. संघशक्ती ज्याला आपण Team Spirit असेही म्हणतो ती अगदी आपल्या घरापासून तर जिथे आपण काम करतो तिथपर्यंत सगळीकडेच खूप महत्त्वाची .प्रत्येक व्यक्ती ही गुणवान असतेच पण तिला तशी संधी मात्र मिळाली पाहिजे किंबहुना मिळवून देण्यासाठी प्रयत्न ही केले पाहिजेत. United we stand जर लक्षात ठेवले तर आपल्या देशाला आणि अर्थातच त्या बरोबर आपल्यालाही प्रगतीपथावर जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही . आणखी एक...... भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याने जर्मनीच्या संघाचे ,त्याच्या खेळाचे आणि आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक केले, ही गोष्ट छोटीशी असली तरी आहे मात्र डोंगराएवढी . कट्टर प्रतिस्पर्ध्याचेही कौतुक करण्याची खिलाडूवृत्ती फक्त मैदानावरच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातही जरी दाखवली तर आयुष्य दडपण न राहता सहज सोपे होऊन जाईल . आम्हा भारतीयांना फक्त पदकाचा आनंद न देता जीवनाचे सार सांगून जाणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे त्रिवार अभिनंदन!!!!!!!
भारती कपटकर--वाळुंज.(6/8/21)