प्रिय स्मिता....
मला न तुला स्मिता न म्हणता' स्मित 'असं म्हणावसं वाटतं कारण तुझ्याइतकं सुंदर स्मितहास्य खचितचं कोणाचे असेल. तु डोळ्यातून हसतेस!!!!! डोळ्यातून हसणारी माणसं खुप सच्ची, खरी असतात असं म्हणतात. बाकी कोणाचे माहीत नाही पण तू मात्र खूप सच्ची आहेस आणि तितकाच तुझा अभिनय. मी आहेस असं म्हणतिये कारण तुझ्या अभिनयाने परिपूर्ण भूमिका तू समोर असल्याची जाणीव करून देतात.
माझ्यासारखा अनेक चाहत्यांना तुझं जाणं मनाला चटका लावणारं होतं. तुझ्यावर लिहिले गेलेले किती लेख,किस्से,पुस्तकं मी आवर्जून वाचली पण तु वेगळीच आहेस,मुक्त आहेस,गूढ आहेस आणि म्हणूनच हवीहवीशी वाटणारी....प्रत्येकासाठी वेगळी.
तुला अभिनय करावा लागलाच नाही कारण प्रत्येक भूमिका तु जगलीस. पण आज मला सारखी डोळ्यासमोर दिसतिये ती जैत रं जैत मधली चिंधी .मी रात टाकली या गाण्यामध्ये कॅमेरा फारसा तुझ्या चेहऱ्यावर नाहीच मुळी पण तुझं चालणं अगदी अस्सल ठाकराच्या युवतीचे. ती तू आहेस खरीखुरी चिंधी नाही हे सांगूनही पटणारं नाही. चालण्याचाही अभिनय असू शकतोआणि तसेच चिंधी कशी आहे हे अवघ्या तीनमिनीटाच्या गाण्यात दाखवून देणाऱ्या तुला मी काय म्हणु????
शालिन ,निरागस असं तुझं मराठमोळं सौंदर्य हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक अढळ स्थानं निर्माण करून गेलं.
तु फार लवकर exit घेतलीस पण जेवढी होतीस तेवढी अजुनही भरून आहेस आसमंतात.
तुला आठवताना 'नभ उतरू आलं' ...... असा वाटतंय खरं...
भारती कपटकर -वाळुंज
17 -10-2019
Nice one
ReplyDeleteतिच्या नजरेचा वचक अजूनही आहे..प्रेमळ आणि तितकाच तिखट..
ReplyDeleteखुपच छान
ReplyDeleteTruly said, Bharti
ReplyDeleteखुपच छान
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice one. Keep writing
ReplyDeleteKhupach Sundar lekh ahe.
ReplyDeleteKeep writing.
Deepali Garud
खूप सुंदर भारती..keep writting...
ReplyDeleteभावना
खूपच अप्रतिम
ReplyDelete