प्रिय बाप्पा
खरं तर मी फार काही श्रद्धाळू नाही . पूजाअर्चा , होमहवन , उपासतापास यांच्या तर वाट्यालाही जात नाही .
रोज संध्याकाळी देवघरात दिवा लावून , शुभंकरोती म्हणून अगदी मनापासून नमस्कार करून
तू फक्त "ताकद दे " अशी हक्काची मागणी करणारी मी , या दहा दिवसांची आतुरतेने वाट पाहत असते .
तुझ्या येण्याच्या कल्पनेने सुद्धा घराघरात नवंचैतन्य निर्माण होते . पुरण पोळी ,मोदक आणि रोज प्रसादासाठी
गोडधोड पदार्थ करून दमायलाही होत नाही . या दहा दिवसात हॉटेलची आठवणही येत नाही .
काय घेऊन येतॊ स रे तू ? चैतन्य , ऊर्जा , बरोबर ना ?
खरंतर तू अगदी कणाकणात आहेस , हे आम्हाला माहित नाही असे मुळीच नाही , पण वर्षभर पुरेल
अशी ऊर्जा द्यायला तुला अगदी असं , स्पेशल यावं लागतं , हो ना ?
संध्याकाळी आरती साठी लगबगीने सगळे घरी पोहचतात आणि त्या निमित्ताने दूरदर्शन मालिकांच्या
पात्रांबरोबर नव्हे तर तुझ्या बरोबर अंगत पंगत होते . अहाहा !!! काय छान वाटते सांगू !
जीन्स टॉप्समधील लाडक्या , त्यांच्याच भाषेत "अगदी एथिनिक " होऊन जातात . मोबाइल वरचे हात
प्रार्थनेसाठी जोडले जातात . नव्या पिढीची बोटे ढोल ताशांच्या नादात अगदी लयदार होतात . बाप्पा तुझ्यात
असं काही तरी आहे की भारवल्यासारखे आम्ही तुझ्या भोवती रुंजी घालतो . तु घरात आहेस म्हणून घराला
कुलूप लावून बाहेर न जाण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आणि कधी आमच्या Home चे Sweethome होऊन
जाते हे कळतच नाही . या साठी तुला खुपसारे मोदक !!!!!
बाप्पा आता हेच बघ रोज नवनवीन विषयांवर लिहिण्याचा फक्त दृढनिश्चय करणारी मी प्रत्यक्षात
मात्र लिहिती झाले ते तू दिलेल्या प्रेरणेमुळेच . हे माझे लिखाणाचे पहिले पुष्प तुझ्या चरणी अर्पण !!!!!!
तुझीच भारती वाळुंज-कपटकर

खूप छान! असेच लिहित रहा, गात रहा! गणपती बाप्पा मोरया !!
ReplyDeleteविचारांचे झरे मनामध्ये प्रकट होने, प्रकट झालेले विचार लिखाणातून व्यक्त होने, लिहिलेले विचारांनी इतरांशी सवांद करणे, या सारखे भाग्य फारच निवडक लोकांच्या नशिबात येते. चेतन भगत, twinkle खन्ना, रॉबिन शर्मा, या सारख्या प्रमाणे आपलं लेखन पुढे जावो हीच शुभेच्छा. धन्यवाद. प्रवीण.
ReplyDeleteसुंदर, लिहायला तुम्ही सुरुवात केलीत हे अतिशय उत्तम! कायम लिहीत जा! पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.
ReplyDeleteNice and wonderful.....
ReplyDeleteThanks for valuable appreciation
ReplyDeleteखुप अप्रतिम लेख लिहिला आहे...तुम्ही आजुनही अप्रतिम लेख लिहू शकता आणि अजून अप्रतिम लेख कविता लिहा ...या साठी खूप खुप शुभेच्छा
ReplyDeleteखूप छान लेखन ,लिहीत रहा.
ReplyDeleteExpressed well👍😊
ReplyDeleteअप्रतिम ..असच लिहीत रहा खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteToo Good...just continue your writing...
ReplyDelete